दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस डॉ. सावंत यांची उपस्थिती

0
11

नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित भाजपशासीत राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सहभाग घेतला.
या परिषदेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती. भाजपशासीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिषदेला उपस्थिती लावली. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा सहभाग होता.

बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, देवेंद्र फडणवीस, बिरेन सिंह बसवराज बोम्बई, जयराम ठाकूर हे दिग्गज नेतेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पक्षाच्या सुशासन धोरणावर चर्चा झाली. त्यासोबतच सर्व राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील विकास आणि कल्याणकारी योजनांचा अहवाल सादर केला. बैठकीत मोदी यांनी, विकास कामांबाबत मार्गदर्शन केले. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली. त्याशिवाय, स्वातंत्र्याच्या उत्सवाबाबत हर घर तिंरगा अभियानाबाबत चर्चा केली.

आजच्या शपथविधीला
डॉ. सावंत यांची उपस्थिती

देशाच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोमवार २५ रोजी २०२२ रोजी होणार्‍या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.