Home बातम्या दिग्विजयना नको पंचतारांकित वास्तव्य

दिग्विजयना नको पंचतारांकित वास्तव्य

0

आतापर्यंत कॉंग्रेसचे सर्व गोवा प्रभारी गोव्यात आल्यानंतर तारांकित हॉटेलचाच पाहुणचार घेत होते. परंतु नवे प्रभारी दिग्वीजय सिंह यांनी आपला गोव्यातील मुक्काम सरकारी गेस्ट हाऊसमध्ये किंवा सर्वसामान्य हॉटेलमध्येच असला पाहिजे, असे स्पष्टपणे प्रदेश कॉंग्रेसला कळविले आहे.

२ आणि ३ जुलै असे दोन दिवस ते गोव्यात असतील. आपल्या वास्तव्यात ते कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी परवा दिल्लीत त्यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनानुसारच भ्रष्टाचारी भाजप विरोधात आवाज उठविणार असल्याचे प्रवक्ते ताम्हणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.