Home बातम्या दारिद्य्र रेषेवरील कुटुंबांना अनुदानित धान्य चालूच राहणार

दारिद्य्र रेषेवरील कुटुंबांना अनुदानित धान्य चालूच राहणार

0

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत २०१३-१४ सालीही दारिद्य्र रेषेवरील कुटुंबांना अनुदानित धान्याचा पुरवठा चालूच ठेवण्याचा निर्णय आर्थिक विषयांवरील कॅबिनेट समितीने काल घेतला. कॅबिनेट समितीने सर्व राज्ये व संघप्रदेशांना ४१.८९ टन्स गहू व १९.८४ टन्स तांदुळ दारिद्य्र रेषेवरील शिधापत्रांकरिता मंजूर केले.

यामुळे २२ राज्ये/संघप्रदेशांमध्ये प्रति कुटुंब १५ किलो धान्य मिळेल. अन्य निवडक १३ राज्यांत शिधापत्रामागे किमाने ३५ किलो धान्य मिळेल. या निवडक राज्यांत इशान्येकडील राज्ये, अंदमान, लक्षद्वीप, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशचा समावेश आहे.