दाबोळी विमानतळावर 5 कोटींचे कोकेन जप्त

0
5

>> एनसीबीच्या गोवा विभागाची कारवाई

एनसीबीच्या गोवा विभागाने कस्टम्स अधिकाऱ्यांच्या मदतीने काल दाबोळी विमानतळावर तब्बल 5 कोटींचे कोकेन हा अमलीपदार्थ जप्त केला. या प्रकरणी गोवा आणि दिल्ली येथे दोघांना अटक केल्याची माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथून दुबईमार्गे दाबोळी विमानतळावर उतरलेल्या सॅम्युअल्स नामक केनियन नागरिकावर कस्टम्स अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला तपासणीसाठी थांबविले. विमानतळावर त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रॉली बॅगच्या छोट्या तळामध्ये लपवून ठेवलेली दोन पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये 1.009 किलो कोकेन आढळून आले. या कोकेनची किंमत ही सुमारे 5 कोटी रुपये एवढी आहे.

त्यानंतर याची माहिती एनसीबीच्या गोवा विभागाला देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी सॅम्युएल याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत ही कोकेनची पाकिटे नवी दिल्लीत एका इसमाकडे पोहचवली जाणार होती. त्या माहितीच्या आधारे या प्रकरणाशी संबंधित जेम्स ईसी या आणखी एका संशयिताला काल दिल्लीत अटक करण्यात आली.