दाबोळी विमानतळावर १.११ कोटींचे सोने जप्त

0
142

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानातून (एआय९९४) १ कोटी ११ लाख ५८ हजार ८८४ रुपयांची २९७६ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे जप्त केली. ही बिस्किटे विमानाच्या प्रसाधनगृहात लपवून ठेवण्यात आली होती.

दाबोळी विमानतळावर काल रविवारी उतरलेल्या या विमानात प्रवाशांची झडती कस्टम अधिकार्‍यांनी घेतली असता त्यांना विमानाच्या प्रसाधनगृहात एक लहान बॅगेत ही बिस्किटे आढळली. कस्टम अधिकार्‍यांनी त्याविषयी विमानातील प्रवाशांकडे विचारणा केली असता त्यावर कोणीही आपला दावा केला नाही. बॅगेतील प्रत्येक बिस्कीट ९९२ गॅ्रमचे होते. कस्टम अधिकार्‍यांनी केलेली ही या आठवड्यातील दुसरी कारवाई आहे.