दाबोळीवर उतरले ९९ प्रवासी

0
192

>> १५ पैकी १३ विमाने झाली रद्द

दाबोळी विमानतळ सेवा कालपासून तीन विमानानी सुरुवात झाली. मुंबई, हैदराबाद, म्हैसूर विमानतळ सेवा सुरू न झाल्याने काल यावयाची १५ पैकी १३ विमाने रद्द करण्यात आली. काल बेंगलोर – दिल्ली – बंगलोर येथून तीन विमानातून एकूण ९९ प्रवासी आले तर त्याच प्रत्येक विमानातून १०० हून अधिक प्रवासी गोव्यातून रवाना झाले.

दुपारी १.३० वाजता बेंगलोर, दिल्ली येथून दोन तर संध्याकाळी ७ वाजता एक विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते. यात तीन्ही विमानातून ९९ प्रवासी गोव्यात दाखल झाले.

दरम्यान आज १५ विमाने उतरणार यासाठी दाबोळी विमानतळावर सकाळपासून पोलीस बंदोबस्त व वाहतूक पोलिस तैनात ठेवण्यात आले होते. तसेच गोवा माईल्सच्या टॅक्सी विमानतळावर सज्ज होत्या. सकाळचीच विमाने रद्द झाली. दुपारी १.०० वाजता पहिले विमान दिल्ली – बंगलोर येथून इंडिगो दाबोळी विमानतळावर ३३ प्रवाशांना घेऊन दाखल झाले. नंतर दुसरे विमान १.३० वाजता विस्तारा हे विमान ३० प्रवाशांना घेऊन दाखल झाले. तर संध्याकाळी सात वाजता तिसरे विमान ३६ प्रवाशांना घेऊन दाखल झाले.
प्रवासी विमाने दाखल होतात त्याचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळावर दक्षतेची उपाय योजना आखली होती. प्रवाशांचे टर्मिनलमध्ये आगमन होताच त्यांची वेब चेकिंग, बोर्डिंग पास, चेकिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक प्रवाशांचा मोबाईलवर आरोग्य सेतु तपासण्यात आला. तसेच कोरोना विषाणूची बाधा झाली नव्हती याची खातरजमा करण्यात आली. तोंडावर मास्क बंधनकारक केल्याने प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होते. त्यानंतर प्रवाशांच्या बॅगेवर सोडियम हायड्रोक्लोराइडचा ङ्गवारा मारण्यात आला. प्रवाशांचे बूट सेनिटाईज करण्यात आले. तसेच एक्स-रे मशीन मधून पाठविण्यात आल्यानंतर प्रवासांचे थर्मल स्कॅनिंग झाल्यानंतर त्यांची सेक्युरिटी चेक अप करण्यात आल्यानंतर त्यांना टर्मिनलच्या बाहेर सोडण्यात आले. यावेळी बाहेर गर्दी होऊ नये यासाठी पोलिस तैनात ठेवण्यात आले होते. गोवा माईल्सच्या टॅक्सी प्रवाशांना घेऊन नेण्यासाठी तैनात होत्या.