या विमानतळावर वर्षाकाठी ४ दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य आहे, असे केंद्रीय हवाई मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. विमानतळावर सध्या विमान पार्कींगसाठी जागा नसल्याने अडचण होत आहे. प्रवाशांचीही प्रचंड गर्दी होत आहे.
यावर्षी प्रवाशांचे प्रमाण ४ दशलक्ष अधिक असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद आपण स्वीकारावे म्हणून हवाई वाहतूकमंत्र्यानी विनंती केल्याचे ते म्हणाले. विमानतळावर आधुनिक सुविधा उपलब्ध केल्याने पर्यटन व्यवसायास चालना देण्यास मदत होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थाही बळकट होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपण वरील प्रकल्पाचे उद्घाटन दि. १९ डिसेंबर रोजी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने १९ रोजीच्या कार्यक्रमास हवाई वाहतूक मंत्र्यांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळेच दि. ३ डिसेंबरला उद्घाटन करण्याचे ठरविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मोठ्या प्रकल्पांनजीक प्रार्थनास्थळे
यापुढे सरकारतर्फे उभारण्यात येणार्या मोठ्या प्रकल्पांनजीक वाहतूकीला व जनतेला अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन धर्मियांना छोट्या आकाराची प्रार्थनास्थळे उभारण्यासाठी कोपर्यात तरतूद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
सर्व धर्मसमभावाचे राज्य म्हणजे अथर्मीराज्य नव्हे. गोव्यातील लोक देेवभक्त असल्याने या भावनेचा विचार करावा लागतो. मडगावातील ‘क्रॉस’ पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच घेतला होता. दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडे या विषयावर चर्चा केली आहे. त्यांनी ‘क्रॉस’ उभारण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आणला असून त्यास तत्वत: मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी सांगितले