Home बातम्या दहावीचा निकाल गुरुवारी

दहावीचा निकाल गुरुवारी

0

गोवा शालांत मंडळाने गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल परवा गुरुवार दि. २३ रोजी संध्याकाळी ४.३० वा. घोषित करण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका २४ रोजी सकाळी १० ते १२ या दरम्यान वितरीत करण्यात येणार आहेत. मुरगांव केंद्राचा निकाल सेंट ऍड्र्यु इन्स्टिट्यूट, वास्को, काणकोण व सासष्टीचा लोलया हायस्कुल, मडगांव, केपें व सांगेंचा, एस्. ई. एस्. हायस्कूल, कुडचडें, फोंडा व धारबांदोडेचा ए. जे. डी. आल्मेदा हायस्कुल, फोंडा, तिसवाडीचा प्रोग्रेस हायस्कुल, पणजी, बार्देश व पेडणेचा ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा व डिचोली आणि सत्तरीचा प्रोग्रेस हायस्कुल, साखळी येथे उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल २४ रोजी आपल्या विद्यालयात मिळू शकेल.