दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

0
91

कुलगामा जिल्ह्यात दहशतवादी व पोलीस तुकडी यांच्यात उडालेल्या चकमकी दरम्यान एक पोलीस शहीद झाला. तसेच एक वॉंटेड दहशतवादी व तीन नागरीकही या धूमश्‍चक्रीत ठार झाले.
कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार येथे एका पोलीस तुकडीला दहशतवाद्यांनी लक्ष्य करून हल्ला चढविल्यानंतर त्यांच्या धुमश्‍चक्री उडाली. त्यात पोलीस तुकडीतील मेहमूद अहमद शेख शहीद झाला. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव फयाज अहमद अश्‍वार उर्फ सेठा असे आहे. २०१५ मधील उधमपूर येथील हल्ल्यातील तो एक सहभागी दहशतवादी होता. त्याला जखमी स्थितीत इस्पितळात नेल्यानंतर तो मरण पावला. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबाराचे तीन नागरीक बळी ठरले असे राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले.