दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद

0
15

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भीमबेर गली आणि पूंछ या दरम्यानच्या मार्गावरून जाणाऱ्या लष्कराच्या एका वाहनावर काल दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तसेच त्यांनी वाहनावर ग्रेनेड हल्लाही केला. त्यात लष्कराच्या वाहनाला आग लागून पाच जवान शहीद झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला तात्काळ राजौरी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.