दयानंद नार्वेकर आपमधून बाहेर

0
9

माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी आम आदमी पक्षापासून फारकत घेतली असून, त्यांनी पर्वरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच मोठ्या गाजावाजासह दयानंद नार्वेकर यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. नार्वेकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून हळदोणा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र त्यांनी आपला निर्णय बदलत आता पर्वरीतून लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे त्यांनी आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी पर्वरीत प्रचाराला सुरुवात केली आहे.