Home बातम्या दफनभूमीतील क्रॉस उखडले

दफनभूमीतील क्रॉस उखडले

0

वेळ्ळी येथील चर्चच्या दफनभूमीतील ९२ क्रॉस उखडून कंपाऊंडच्या बाहेर फेकून देण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी दफनभूमीत आलेल्या फादरना सर्वप्रथम क्रॉस गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इतरांना सूचित केले.

त्यानंतर या ठिकाणी लोकांचीही गर्दी जमली. शोधाशोध केल्यानंतर क्रॉस कंपाऊंडच्या बाहेर टाकलेले आढळले. हा प्रकार नक्की कुणी केला याचा तपास लागलेला नसून मात्र संशयावरून तेथे भटकताना आढळलेल्या मानसिक रुग्ण महिलेला ताब्यात घेऊन बांबोळी येथे मानसोपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे.