दक्षिण गोव्यात रविवारी वीजपुरवठा सुरुच राहणार

0
7

मान्सूनपूर्व वार्षिक दुरुस्तीचे काम रविवार दि. 30 एप्रिल रोजी हातात न घेण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला असल्याने या दिवशी दक्षिण गोव्यात वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे काल वीज खात्याने स्पष्ट केले. फोंडा शहर सोडून संपूर्ण दक्षिण गोव्यात रविवारी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे वीज खात्याने जाहीर केले होते; मात्र काही कारणांमुळे हे मान्सूनपूर्व काम पुढे ढकलण्यात आले असून, त्यामुळे रविवारी दक्षिण गोव्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.