Home बातम्या दक्षिण कलेक्टोरेटला माथानी साल्ढानांचे नाव

दक्षिण कलेक्टोरेटला माथानी साल्ढानांचे नाव

0

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे नामकरण माथानी साल्ढाना ऍडमिनिस्ट्रेटीव्ह कॉम्प्लेक्स असे केले.

नामकरणानिमित्त नव्या संकुलातील परिषदगृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह, समाज कल्याण मंत्री महादेव नाईक, मच्छीमारी मंत्री आवेर्तीन फुर्तादो व वनमंत्री अलिना साल्ढाना उपस्थित होत्या. आमदार बेंजामीन सिल्वा, राजेंद्र नाईक, एनआरआय आयुक्त विल्फ्रेड मिस्किता यांचीही उपस्थिती होती.

येत्याकाळात सरकारी कार्यालये या संकुलात एकत्र आणली जाणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. लोकांनीही या संकुलाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.