दक्षिण आफ्रिका १० गड्यांनी विजयी

0
249

क्विंटन डी कॉक (नाबाद १६८) व हाशिम आमला (नाबाद ११०) यांच्या तुफानी खेळींच्या बळावर द. आफ्रिकेने काल रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा १० गडी व ४३ चेंडू राखून धुव्वा उडविला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेविरुद्धची आपली सर्वोत्तम ७ बाद २७८ अशी धावसंख्या रचली. कर्णधार मुश्फिकुर रहीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकणारा पहिला बांगलादेशी होण्याचा मान मिळवत नाबाद ११० धावा केल्या परंतु. या विक्रमानंतरही बांगलादेशचा संघ विजयाच्या जवळपासही गेला नाही. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने आपल्या २९ धावांच्या खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ हजारांचा टप्पा ओलांडत पाच हजारांहून जास्त धावा व २०० पेक्षा जास्त बळी घेणार्‍या अब्दुल रझाक, जॅक कॅलिस, शाहिद आफ्रिदी व सनथ जयसूर्या यांच्या पंक्तित स्थान मिळविले. बांगलादेश व द. आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना बोलंड पार्क मैदानावर १८ रोजी खेळविला जाणार आहे.