कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरती झालेल्या कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ केल्याने गरिबांवर अन्याय झाल्याचे सांगून सरकारला हवा तसाच दक्षता खात्याकडून अहवाल तयार करून घेतल्याचा आरोप कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
आपल्या पक्षाच्या केडरमधील लोकांना सामावून घेण्याचा त्यांचा हेतू असावा, असा संशयही लॉरेन्स यांनी व्यक्त केला.
सरकारने रिलायन्स अन्य मोठ्या कंपन्यांची थकबाकी देण्याचे काम केले आहे. परंतु विकासकामे केलेल्या कंत्राटदारांची बिले फेडण्यास सरकार चालढकल का करीत आहे, असा प्रश्न करून साध्या कंत्राटदारांची सरकारने बिले फेडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वेगवेगळ्या खाण परिसरातील कमी दर्जाच्या खनिजाच्या साठ्यावर वृक्ष लागवड केलेली आहे. त्यामुळे सरकारने ‘डंप’ उचलण्यापूर्वी योग्य तो विचार करावा, पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेऊनच ‘डंप’च्या बाबतीत निर्णय घ्यावा, असे आवाहन लॉरेन्स यांनी केले आहे.