थिवी येथे तळीत बुडून तरुणाचा मृत्यू

0
2

शिवराकवाडा, माडेल-थिवी येथील गणपती विसर्जन तळीमध्ये काल दुपारी नसीम शाह (24, मूळ उत्तर प्रदेश, सध्या रा. मुशीरवाडा-कोलवाळ )या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सविस्तर माहितीनुसार, नसीम शाह आणि त्याचे सहकारी मित्र मिळून एकूण 6 जण शिवराकवाडा येथील गणपती विसर्जन तळीत आंघोळीसाठी उतरले होते. त्यावेळी नसीम शाह व्हिडिओ काढत होता. त्याचवेळी तो पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह तळीमध्ये असलेल्या झुडपामध्ये अडकून राहिला होता. तो बाहेर काढण्यासाठी म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांना बरेच प्रयत्न करावे लागले. या घटनेची माहिती कोलवाळ पोलिसांना संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.