26 C
Panjim
Saturday, October 31, 2020

थायलंडला नमवित भारत उपांत्य फेरीत

>> आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद

भारतीय पुरुष संघाने ०-२ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना थायलंडचा ३-२ असा पराभव करीत आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मनिला-फिलिपिन्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील या विजयामुळे भारतीय संघाने पदकही निश्‍चित झाले आहे. भारतीय संघाची उपांत्य फेरीत आता दोन वेळच्या विजेत्या इंडोनेशियन संघाशी गाठ पडणार आहे.
भारताचे स्टार शटलर्स किदाम्बी श्रीकांत आणि साई प्रणीत यांना पहिले दोन्ही एकेरीचे सामने गमवावे लागल्याने भारतीय संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला होता. साई प्रणीतला जागतिक १२व्या स्थानावरील कांताफोन वांगचरोईन याच्याकडून १४-२१, २१-१४, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसर्‍या एकेरीत माजी जागतिक अग्रमानांकित शटलर किदाम्बी श्रीकांतला तीन वेळचा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जेत्या कुन्लावुत विटिडसर्नने २०-२२, १४-२१ असे नमविल्याने भारतीय संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला होता.

परंतु पहिल्या दुहेरीच्या लढतीत एमआय अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी किट्टिनूपोंग केड्रेन आणि तनुपत विर्यांगकुरा यांना २१-१८, २२-२० पराभूत करीत भारताचे आव्हान जिवंत राखले.
परतीच्या एकेरीत युवा लक्ष्य सेनने विश्व क्र. ४५व्या सपान्यू अविव्हिंगनसनवर २१-१९, २१-१८ अशी मात करीत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. तर दुसर्‍या दुहेरीत चिराग शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत यांनी जागतिक १२व्या स्थानावरील मनिपोंग जोंगजित आणि निपीटफॉन फुआंगफुआपेट यांना २१-१५, १६-२१, २१-१५ असे नमवित भारताच्या ३-२ अशा विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.
भारतीय संघाने हैदराबादेत २०१६ साली झालेल्या या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मेहेरनजर का?

राज्याच्या राजधानीमध्ये मांडवीच्या उरावर गोमंतकीय जनतेला वाकुल्या दाखवत तरंगणारे कॅसिनो येत्या एक नोव्हेंबरपासून पुन्हा खुले होणार आहेत. पन्नास टक्के क्षमतेने ते सुरू...

आयआयटी प्रकल्पासाठी सहकार्य द्या

>> मुख्यमंत्र्यांचे मेळावलीत आवाहन, स्थानिकांचा प्रखर विरोध मेळावलीत आयआयटी प्रकल्प उभारायचा की नाही हे आताच सरकार ठरवणार नाही. त्यासाठी...

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच कॅसिनो परवान्यांचे नूतनीकरण

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती पणजी महानगरपालिकेने कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण केलेले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...

मायकल लोबोच भाजप सोडण्याच्या तयारीत ः साळगावकरांचा आरोप

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याकडून सरकारच्या धोरणाविरोधात वक्तव्ये केली जातात. यावरून मंत्री लोबो भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा...

सिलिंडर, बँक व रेल्वे वेळापत्रक नियमांत १ पासून महत्त्वाचे बदल

संपूर्ण देशभरात रविवार दि. १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज तसेच रेल्वे वेळापत्रकाच्या नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.१ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूक केल्यानंतर...

ALSO IN THIS SECTION

ऊस उत्पादकांची थकित रक्कम सोमवारपर्यंत देणार ः मुख्यमंत्री

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस कापणीची थकीत रक्कम सोमवारपर्यंत वितरित करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची...