23 C
Panjim
Monday, January 25, 2021

त्सित्सिपासची प्रगती; प्लिस्कोवा द्वितीय

ग्रीसचा युवा स्टार स्टेफानोस त्सित्सिपास याने एटीपी क्रमवारीत वैयक्तिक सर्वोत्तम सहावे स्थान मिळविले आहे. रोममधील शानदार कामगिरीच्या बळावर त्सित्सिपासने उन्नती साधली आहे. उपांत्य फेरीत राफेल नदालकडून पराभूत होण्यापूर्वी त्सित्सिपासने जान्निक सिन्नर व फाबियो फॉनिनी यांचा पराभव केला होता. केई निशिकोरीची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. ‘टॉप १०’मध्ये हा एकमेव बदल झाला आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दिएगो श्‍वाटर्‌‌झमन याचे ‘अव्वल २०’मध्ये पुनरागमन झाले आहे. रोममधील स्पर्धेच्या ‘अंतिम आठ’मध्ये त्याने केई निशिकोरीवर सनसनाटी निकालाची नोंद केली होती. उपांत्य फेरीत मात्र जोकोविचविरुद्ध त्याचा खेळ खुलला नव्हता. फर्नांडो वर्दास्को याने १२ स्थानांची उडी घेत २६व्या स्थानासह मागील पाच वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. काईल एडमंड, डॉमनिक थिम व कारेन खाचेनेव यांच्यावरील विजयाचा त्याला मोठा लाभ झाला. रोममधील स्पर्धा जिंकूनही नदालचे दुसरे स्थान कायम आहे. पहिल्या स्थानावरील जोकोविच व दुसर्‍या स्थानावरील नदाल यांच्यात चार हजारांहून जास्त गुणांचा फरक आहे.

एकेरीतील भारतीय खेळाडूंसाठी मागील आठवडा चांगला ठरल्याने त्यांनी प्रगती केली आहे. प्रज्ञेश गुणेश्‍वरन (+ ३, ८६वे स्थान) हा सर्वोत्तम स्थानावरील भारतीय खेळाडू आहे. यानंतर रामकुमार रामनाथन (+ १, १४४वे स्थान), साकेत मायनेनी (+ १, २४५वे स्थान), सुमीत नागल (+ २२, २८१वे स्थान) व शशी कुमार मुकुंद (+ ४, २९५वे स्थान) यांचा क्रम लागतो.

एटीपी टॉप १० ः १. नोवाक जोकोविच (सर्बिया, १२,३५५), २. राफेल नदाल (स्पेन, ७९४५), ३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ५९५०), ४. डॉमनिक थिम (ऑस्ट्रिया, ४८४५), ५. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ४१५५), ६. स्टेफानोस त्सित्सिपास (ग्रीस, ४०८०), ७. केई निशिकोरी (जपान, ३८६०), ८. केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका, ३७४५), ९. जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना, ३२३५), १०. जॉन इस्नर (अमेरिका, २९४०)

कॅरोलिना प्लिस्कोवा हिने सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या डब्ल्यूटीए क्रमवारीत पाच स्थानांची मोठी उडी घेत द्वितीय क्रमांकावर हक्क सांगितला आहे. इटालियन ओपन विजेतेपदासह प्लिस्कोवाने ही मोठी मजल मारली असून झेक प्रजासत्ताकच्या या खेळाडूकडून नाओमी ओसाका हिच्या अग्रस्थानाला धोका निर्माण झाला आहे. रोममध्ये झालेल्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत २७ वर्षीय प्लिस्कोवाने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील १३वे डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावले होते. रविवारपासून होणार्‍या फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी प्लिस्कोवाला द्वितीय मानांकन लाभले आहे. लालमातीवरील या स्पर्धेत प्लिस्कोवाला २०१७ साली उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती. यावेळी मात्र मागील कामगिरी सुधारण्यासाठी ती सज्ज झाली आहे. फ्रेंच ओपनच्या विद्यमान विजेत्या सिमोना हालेपची तिसर्‍या स्थानी घसरण झाली असली तरी ओसाकाला आपले पहिले स्थान राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. प्लिस्कोवाच्या प्रगतीमुळे तीन ग्रँडस्लॅम विजेती अँजेलिक कर्बर व पेट्रा क्विटोवा यांना अनुक्रमे दोन व एका स्थानाचा तोटा झाला आहे. सेरेना विल्यम्सने दीर्घ कालावधीनंतर टॉप ‘१०’मध्ये पुनरागमन झाले आहे. महिला एकेरीतील भारताच्या तीन आघाडीच्या खेळाडूंची घसरण झाली आहे. अंकिता रैना (-१, १७२वे स्थान), करमन थंडी (-२, २२४वे स्थान), प्रांजला यडलापल्ली (-१३, २७८वे स्थान) यांना सकारात्मक दिशेने वाटचाल करणे शक्य झाले नाही. दुहेरीत मात्र प्रार्थना ठोंबरे (+ ४, १४९वे स्थान), ऋतुजा भोसले (+ ३, १८८वे स्थान), अंकिता रैना (+ १, २१५वे स्थान) यांनी प्रगती केली आहे.

डब्ल्यूटीए टॉप १० ः १. नाओमी ओसाका (जपान, ६४८६ गुण), २. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ५६८५), ३. सिमोना हालेप (रोमानिया, ५५३३), ४. किकी बर्टेन्स (नेदरलँड्‌स, ५४०५), ५. अँजेलिक कर्बर (जर्मनी, ५०९५), ६. पेट्रा क्विटोवा (झेक प्रजासत्ताक, ५०५५), ७. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ४५५२), ८. ऍश्‍ले बार्टी (ऑस्ट्रेलिया, ४४३०), ९. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ३९६७), १०. सेरेना विल्यम्स (अमेरिका, ३५२१).

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागे हटू नये

केंद्र सरकारने नवा मोटरवाहन कायदा लागू करून एव्हाना दीड वर्ष झाले, परंतु या ना त्या कारणावरून राज्य सरकारने अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात...

प्रस्ताव मान्य असेल तरच चर्चा

>> केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना निर्वाणीचा इशारा, टॅ्रक्टर मोर्चा काढण्यावर शेतकरी ठाम कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटना...

अधिवेशनात पालिका कायदा दुरुस्ती विधेयकास विरोध करणार ः कामत

राज्य सरकारने लोकायुक्त कायदा कमकुवत करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष लोकायुक्त आणि नगरपालिका कायद्यातील...

कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जूनमध्ये निवडणार

>> पक्षाच्या बैठकीत निर्णय कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यात निवडण्यात येणार असल्याचा निर्णय काल पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.पाच राज्यांच्या...

लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना सध्या रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल केले आहे....

ALSO IN THIS SECTION

प्रस्ताव मान्य असेल तरच चर्चा

>> केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना निर्वाणीचा इशारा, टॅ्रक्टर मोर्चा काढण्यावर शेतकरी ठाम कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटना...

अधिवेशनात पालिका कायदा दुरुस्ती विधेयकास विरोध करणार ः कामत

राज्य सरकारने लोकायुक्त कायदा कमकुवत करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष लोकायुक्त आणि नगरपालिका कायद्यातील...

कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जूनमध्ये निवडणार

>> पक्षाच्या बैठकीत निर्णय कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यात निवडण्यात येणार असल्याचा निर्णय काल पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.पाच राज्यांच्या...

लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना सध्या रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल केले आहे....

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ५२० जणांना कोरोना लस

>> एकूण ९४६ आरोग्य कर्मचार्‍यांना लस राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ५२० आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस काल देण्यात...