त्रिपुरा निवडणुकीत 81 टक्के मतदान

0
13

त्रिपुरातील विधानसभेच्या 60 जागांसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 81 टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीचा निकाल 2 मार्चला लागणार आहे. एकाच टप्प्यात पार पडलेल्या या मतदानात 259 उमेदवार रिंगणात उतरले होते. दरम्यान, ट्विटरवर मतदानाचे आवाहन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस पाठवली आहे.