‘त्या’ श्वानाच्या मालकाला अटक

0
6

दोन दिवसांपूर्वी ताळगाव येथे ज्या श्वानाने एका मातेसह तिच्या दोन लहान मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते, त्या श्वानाचे मालक माधवराव चौहान (63) याला काल पणजी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी सदर श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांनी केलेल्या पोलीस तक्रारीनंतर श्वानाच्या मालकाला अटक करण्यात आली. माधवराव चौहान याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो लोक सोमवारी त्याच्या बंगल्याबाहेर जमले होते.

रॉटविलर जातीच्या या श्वानाने केलेल्या हल्ल्यात एक महिला व दोन मुले गंभीररित्या जखमी झालेली आहेत. या जखमांसाठी टाकेही घालावे लागले आहेत. तिघाही जणांची प्रकृती सुधारली असली तरी जखमां भरण्यासाठी एक-दोन महिने लागणार असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची गोवा राज्य बाल संरक्षण आयोगानेही दखल घेतली होती.