‘त्या’ रिक्षावाल्याशी केजरीवालांची भेट; माफी

0
79
परवा दिल्लीत निवडणूक रॅलीच्या वेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर थप्पड लगावणार्‍या रिक्षावाल्याची भेट घेऊन केजरीवाल यांनी त्याला माफ केले.

दिल्लीच्या उपनगरी भागात अमन विहार येथील या ३८ वर्षीय लाली नामक रिक्षावाल्याच्या घरी काल केजरीवाल पोचले. दरम्यान, यावेळी रिक्षावालाही भावूक बनला व चुकून आपल्या हातून कृत्य घडल्याचे सांगितले. केजरीवाल हे साक्षात देव असल्याचे तो म्हणाला. केजरीवाल यांनी सरकार सोडले या रागाने मी ते कृत्य केले. सरकार केवळ लोकपाल विधेयकासाठी नसते, असे तो म्हणाला. केजरीवाल गेल्याने त्यांची आश्‍वासने अर्धवट राहिल्याचे तो म्हणाला. लाली याने परवा आधी केजरीवाल यांच्या गळ्यात हार घातला होता व नंतर थप्पड मारले होते, ज्यामुळे केजरीवाल यांचा डोळा सुजला होता. मात्र कुणी तक्रार न दिल्याने रीक्षावाल्याला पोलिसांनी सोडून दिले होते.