‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू

0
6

गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गोवा विद्यापीठाने दोन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाचा अहवाल पोलीस खात्याला पाठविला आहे. पोलीस महासंचालकांनी हा अहवाल पोलीस खात्याच्या संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविला असून, या प्रकरणी चौकशीनंतर योग्य निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.