दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदलीवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. आता केंद्र लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडणार आहे. आम आदमी पार्टी (आप) या विधेयकाला सभागृहात विरोध करणार आहे. त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे.