मेरशी येथे कोमुनिदादच्या खारफुटी झाडांच्या क्षेत्रात टाकलेला मातीचा भराव येत्या 15 दिवसांत हटविण्याचा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. मेरशी येथील महामार्गाजवळील कोमुनिदादच्या जागेत खारफुटी झाडांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या मातीच्या भरावामुळे खारफुटीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. गोवा खंडप़ीठाच्या निर्देशानुसार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी मेरशी येथे कोमुनिदादच्या जागेतील मातीच्या भरावाची सोमवारी पाहणी करून अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालाच्या आधारे गोवा खंडपीठाने येत्या 15 दिवसांत खारफुटी क्षेत्रातील मातीचा भराव हटविण्याचा आदेश जारी केला असून कार्यवाही अहवाल सादर करण्याचा आदेश संबंधित अधिकारीणींना दिला आहे.

