तोरसे येथील श्वेता नाईक या युवतीवर हल्ला करणारा संशयित प्रसाद मोटे याला पेडणे न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांचा रिमांड देण्यात आला.
१० रोजी सायंकाळी प्रसादने श्वेतावर चाकुने हल्ला केला होता. वार तिच्या मानेवर करण्यात आला मात्र बचावासाठी तिने हात मध्ये आणल्यामुळे तिच्या हातास गंभीर दुखापत झाली होती.
श्वेतावर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहेत. प्रसादला ११ रोजी अटक करण्यात आली होती. हल्ल्यासाठी वापरलेला चाकुही पोलिसांनी हस्तगत केला आहे.