पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी आकय (करासवाडा-म्हापसा) येथील जुली ङ्गर्नांडिस (६५) हिच्या अंगावरील सुमारे ९० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात नोंदविली आहे.
काल सकाळी जुली ही सावंतवाडीहून बसने करासवाडा येथे आली व नंतर करासवाडा येथून आकय येथे आली. तेथे मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी आपण पोलीस असल्याचे सांगून तिला गळ्यातील दागिने पिशवीत ठेवायला सांगितले. तेवढ्यात समोरून आलेल्या व्यक्तीला तेथे बोलावून नंतर तोतया पोलीस, सदर व्यक्ती व जुली यांनी ते दागिने पिशवीत ठेवले. काही अंतर चालून गेल्यावर दागिने गळ्यात नसल्याकडे कुणीतर लक्ष वेधले असता तिने पिशवीत पाहिले असता दागिने नव्हते व तिला आपल्याला लुटल्याचे कळून चुकले होते.