Home बातम्या ‘तृष्णा’तील भूमिकेमुळे भावनिक समाधान : फ्रीडा

‘तृष्णा’तील भूमिकेमुळे भावनिक समाधान : फ्रीडा

0

चित्रपटाच्या कथावस्तूने, अभिनय कौशल्य आणि मर्यादा शोधण्याची संधी मिळाल्याचेही तिने नमूद केले. यावेळी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया व संकल्पना याविषयी फ्रिडा पिंटो व मिशेल विंटरबॉटम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘तृष्णा’ हा चित्रपट थॉमस हार्डी यांची कादंबरी ‘तेस ऑफ द डर्बर विलेज’ वर आधारित आहे. प्रेम व परिस्थिती यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या महिलेची ही कथा आहे. या चित्रपटातील ‘तृष्णा’ ची भूमिका फ्रीडा पिंटोच साकारू शकेल, कारण आधुनिक जाणिवा असलेल्या भारतीय स्त्रीची ती प्रतिनिधित्व करते, असे दिग्दर्शक मिशेल विंटरबॉटम म्हणाले. आपले काही चित्रपट निर्मितीप्रक्रियेत असून भारत केंद्रित चित्रपटांमध्ये भूमिका करायला आपले प्राधान्य राहील असेही यावेळी फ्रीडा हिने सांगितले.