तृणमूलच्या बंडखोर खासदारांची यादी समोर

0
10

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फूट पडल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र फुटलेले खासदार नेमके कोण हे स्पष्ट झाले नव्हते. आता फुटलेल्या खासदारांची एक यादी समोर आली आहे. त्यामध्ये 19 खासदारांचा समावेश आहे. या यादीत अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि सायोनी घोष यांच्याही नावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक यादी सही करुन दिल्याचे बोलले जात आहे.

श्चम बंगालच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहेत. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण 28 खासदार आहेत. जर 19 बंडखोर खासदारांचे दावे खरे ठरले, तर हा तृणमूलसाठी मोठा राजकीय धक्का असणार आहे.

बंडखोर खासदारांच्या यादीत काकोली घोष, जगदीश चंद्र बसुनिया, खलीलुर रहमान, युसूफ पठाण, अबू ताहीर खान, पार्थ भौमिक, बापी हलदर, सायोनी घोष, माला रॉय, मिताली बाग, दीपाली अधिकारी, कालीपद सोरेन, जून मालिया, अरुप चक्रवर्ती, डॉ. शर्मिका सरकार, शत्रुघ्न सिन्हा, असित कुमार मल, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेत सुरू झालेले हे बंड आता पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वासाठीच्या लढाईत बदलत असल्याचे दिसत आहे. एकीकडे ममता बॅनर्जींचा गट दिल्लीत राजकीय पर्याय शोधत आहे, तर दुसरीकडे बंडखोर गट संघटनेतील बहुमत, आमदार आणि खासदारांच्या जोरावर स्वतःला खरी तृणमूल काँग्रेस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. 28 वर्षे जुनी तृणमूल काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत असल्याचे दिसत आहे.