तृणमूलचे आणखी ६ उमेदवार जाहीर

0
8

तृणमूल कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या आणखी ६ उमेदवारांच्या नावांचा समावेश असलेली तिसरी यादी जाहीर केली. तृणमूलने आतापर्यंत २४ उमेदवार जाहीर केले आहेत.

तृणमूलच्या तिसर्‍या यादीत म्हापशातून तारक आरोलकर, साळगावातून भोलानाथ घाडी साखळकर, मुरगावातून जयेश शेटगावकर, वास्कोतून सैफुल्ला खान, केपेतून कांता गावडे आणि सांगेतून राखी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेस व मगो यांच्यात युती असून, तृणमूल २८ जागांवर, तर मगो १२ जागांवर लढणार आहे.