25.7 C
Panjim
Friday, February 26, 2021

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला

योगसाधना – ४९२
अंतरंग योग – ७७

 • डॉ. सीताकांत घाणेकर

निसर्गाचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की तो ऋतुमानाप्रमाणे फळ व वनस्पती देतो. आयुर्वेदाने यावर चिंतन केले आहे. हिवाळ्यात कडक थंडीमुळे सर्व अवयव आखडून जातात. अशावेळी स्निग्धतेची गरज असते. या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्य आहे.

भगवंताने एक सुंदर विश्‍व निर्माण केले. त्यात विलोभनीय सृष्टी निर्माण केली. त्याने असंख्य जीव-जंतू-प्राणी निर्माण केले. त्यात एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मानव- महान बुद्धिमान.
कदाचित विश्‍वकर्त्याची इच्छा असेल की सर्व विश्‍व एकच राहावे- विभाजनाशिवाय! सर्व प्राणी तसेच राहतात. पक्षी तर ऋतुबदलाप्रमाणे विविध देशात भ्रमण करतात. पण माणसाने स्वार्थापोटी विभाजन केले- विविध राष्ट्रे- अनेक भाषा, धर्म, रंग, वर्ण…
सर्वच देश देवाला प्रिय. पण भारत देश अत्यंत प्रिय. भव्य दिव्य अशा संस्कृतीने नटलेला. जगाला मार्गदर्शक- विविध क्षेत्रात आणि इथे बघा ना – अनेक भाषा पण संस्कृती एक. अनेक धर्म पण बहुतेक एकोप्याने राहणारे. आता काहीवेळा काही जणांच्या स्वार्थापोटी तंटे- बखेडे होतात. पण परत एकत्र येतात. मतभेद असता कामा नये. त्यामुळे संघाला बाधा येते.
भारताचे सणदेखील विविध- आपण विचार करतो तो मकर संक्रांतीचा.
संक्रांती म्हणजे संघ क्रांती. संघ म्हटले म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन एका विशिष्ट ध्येयासाठी कार्य करणे असते. व्यक्ती तितक्या प्रकृती. वेगवेगळी मते. म्हणूनच एकत्र आलेल्या सर्व व्यक्तींचे संबंध स्नेहपूर्ण व मधुर असणे अपेक्षित आहे. कारण त्यामुळे ध्येय गाठणे सोपे होते. प्रत्येक क्षणात काही विशेष प्रथा व कर्मकांडे असतात. संक्रांतीमध्ये तीळगुळाचे लाडू एकमेकांना देतात. त्यामागे एक सुंदर व उच्च त्तत्त्वज्ञान आहे. उगाच लाडू द्यायचे नसतात.

 • तिळात स्निग्धता आहे. रूक्ष बनलेल्या आपल्या संबंधात तीळ स्निग्धता आणू शकतील व गूळ गोडवा आणून मनातील कटुता दूर करते. अशी त्यामागची भावना असते.
  मुख्य म्हणजे आपण लाडू घेताना व खाताना हा भाव समजायला हवा.
  तसेच तीळगूळ देताना म्हणतात- तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.
 • तीळ म्हणजे स्निग्धता व गूळ म्हणजे गोडवा. दोघांचे प्रतीक म्हणजे तीळगूळ.
  समाज म्हटला म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आल्याच. मग तो परिवार असू दे, शेजारी असू दे, कामाच्या ठिकाणी किंवा समारोहात असू दे. अनेकवेळा लहानमोठे मतभेद असतात. काही वेळा भांडणं झालेली असतात. काही तर अगदी उच्च कोटीला पोचलेले असतात. तेव्हा समाजात राहूनही माणसाला एकटेपणा जाणवतो. म्हणूनच पूर्वज म्हणायचे….
 • झाले- गेले विसरून जा. परत एकोप्याने, प्रेमाने राहा. हल्ली अनेक कुटुंबात असे दृश्य दिसते. ही गोष्ट कुणासाठी हितावह नाही, तशीच भूषणावहसुद्धा नाही. मानव स्वार्थी व आत्मकेंद्री होत आहे. त्यामुळे असा कडवटपणा दिसून येतो. मकर संक्रांत हा एक उत्कृष्ट सण आहे. तरी सुरुवात करायला सर्वांची इच्छा व सहकार्य हवे.
  पू. पांडुरंगशास्त्रींसारखे महापुरुष जे समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतात, ते म्हणतात – ‘‘या उत्सवानिमित्त स्नेह्यांकडे जायचे असते. तिळाचे लाडू द्यायचे असतात. जुने मतभेद काढून टाकायचे असतात. भांडणे विसरायची असतात. स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठा करायची असते. महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय प्रचलित आहे. गुजरातमध्ये आजही ब्राह्मणांना लाडू देण्याची प्रथा आहे. त्याच्यामागे एक वेगळा भाव लपलेला आहे.
  ‘‘जुन्या काळात ब्राह्मणवर्गाचे कार्य अध्ययन व अध्यापन हे होते. समाज जीवनात सांस्कृतिक मूल्ये गुंफलेली राहावीत यासाठी ते धर्म व संस्कृती यांचे मज्जातंतू बनून राहत. मानव जेव्हा स्वच्छंदी बनतो, धर्म व संस्कृती बाजूला सारतो. वाकड्या रस्त्याने चालू लागतो त्यावेळी दोन शब्द सांगून, हात पकडून, त्याला खर्‍या रस्त्यावर घेऊन येण्याची जबाबदारी ब्राह्मणावर होती.

सारांश- त्याला दोन कटू शब्दही बोलावे लागत आणि ब्राह्मण कटू होत असे. त्याला कटू व्हावे लागत असे. तो कडू बोलल्यामुळे संभवता आपण त्याच्याबद्दलचा आदर गमावूनही बसतो. आपले संबंधही थंडावतात. ते संबंध तुटू नयेत म्हणून ब्राह्मणाकडे जाऊन तीळगुळाच्या लाडवांद्वारे आपल्या मनाची स्निग्धता व हृदयाचा गोडवा द्यायचा. जुना स्नेह पुन्हा उभा करायचा आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात त्याचे गौरवाने भरलेले स्थान टिकवून ठेवायचे.
खरेच, महापुरुषांकडून असे ज्ञान मिळाले की वाटते आज हे तत्त्वज्ञान कुणाला माहीत आहे? त्यामुळे आपण अनेक गोष्टी विसरलो आहोत. चातुर्वर्णामागची पूर्वजांची, जाणकारांची भूमिका विसरलो आहोत. आज जन्माप्रमाणे वर्ण ठरवला जातो. त्यामुळे समाजाची परिस्थिती काय झाली आहे, सर्वज्ञात आहे.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात- ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः’- गीता- ४.१३ – गुणांच्या आणि कर्मांच्या भेदाप्रमाणे (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र) या चार वर्णांची व्यवस्था मीच निर्माण केली आहे. मी तिचा कर्ता आहे.

आज आम्ही जन्माप्रमाणे वर्ण ठरवतो त्यामुळे ब्राह्मण म्हणवणार्‍यांमध्ये ब्राह्मणाचे गुण असतात का? त्याचे कर्म सात्त्विक असते का? फक्त सात्त्विक गुण व कर्म अपेक्षित नाही तर आहार, विचारसुद्धा सात्त्विक हवेत. आज ब्राह्मण राजसी व तामसी झाले आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण या विषयावर उत्तम मार्गदर्शन करतात.
एक मान्यता आहे –
‘‘जन्मना जायते शुद्रः संस्कारात द्विजउच्यते’’.

 • जन्माने सर्व शूद्र आहेत. संस्कारानंतर ते द्विज म्हणजे ज्ञानी ब्राह्मण होतात.
  भारतात ‘मुंज’ संस्कार त्यासाठीच करतात. आज भलेही ते एक कर्मकांडंच होऊन बसलं आहे. त्यामागील भाव, दृष्टी, तत्त्वज्ञान बहुतेकांना माहीत नाही.
  ‘आजचा ब्राह्मण कर्मकांडी ‘भट’ बनलेला आहे. तो फक्त दक्षिणा घेतो. तसेच धर्माचरण न करणार्‍याला तो काहीदेखील सांगत, समजावत नाही. कारण त्याचा उदरनिर्वाह जनतेवर अवलंबून आहे.
  आता हा दृष्टिकोन विविध पेशांमध्ये दिसून येतो- शिक्षक, डॉक्टर, राजकारणी, व्यापारी…. फक्त एकाला दोष देणे म्हणजे चुकीचे ठरेल. म्हणून प्रत्येकाने आपला धर्म- म्हणजे कर्तव्य समजून कार्य करायला हवे.
  शास्त्रीजी पुढे सांगतात की तिळाच्या लाडवात पैसे घालून देण्याची प्रथा आहे. ती गुप्तदानाचा महिमा समजावते. सांस्कृतिक कार्य करणार्‍या तेजस्वी ब्राह्मणाची जीवनव्यवस्था समाजाने गुप्त रीतीने चालवली पाहिजे. लाडवात असलेले तेल पुष्टिप्रद आहे. सांस्कृतिक क्रांतिवीर पुष्ट मन-बुद्धीचा असला पाहिजे. प्रभूकार्याचे व्रत हे असिधारा व्रतासारखे कठीण व्रत आहे. त्यात दुर्बल किंवा फुकट वृत्तीच्या आणि अस्थिर मनबुद्धीच्या माणसाचे काम नाही.
  निसर्गाचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की तो ऋतुमानाप्रमाणे फळ व वनस्पती देतो. आयुर्वेदाने यावर चिंतन केले आहे. हिवाळ्यात कडक थंडीमुळे सर्व अवयव आखडून जातात. अशावेळी स्निग्धतेची गरज असते. या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्य आहे. यावेळी शेतातूनही ताजे तीळ घरात आलेले असतात.

संक्रांतीच्या दिवशी आणखी एक चांगली प्रथा म्हणजे – पतंग उडवणे. या खेळालाही पुष्कळ अर्थ आहे. पतंग उडवण्यासाठी खुल्या मैदानात किंवा घराच्या टेरेसवर जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते. सर्व दृष्टीने – मुख्यत्वे करून आरोग्यास याचे चांगले लाभ मिळतात.
तसेच यामुळे अनेकजण एकत्र येतात. सामाजिक बांधीलकी वाढते.
पू. पांडुरंगशास्त्री एक छान तत्त्वज्ञान सांगतात –

 • या दिवशी जसे आकाशात विविध रंगांचे पतंग उडतात तसेच विश्‍वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश, विद्वान, श्रीमंत असे अनेक पतंग उडत असतात. पतंगांची हस्ती व मस्ती तोपर्यंतच राहते जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते. हातातून सुटलेला पतंग कुठेतरी, झाडावर, विजेच्या तारेवर, संडासाच्या टाकीवर- फाटलेला व विकृत दशेत पडलेला मिळतो. तसाच देवाच्या हातातून सुटलेला मानवरुपी पतंग रंग उतरलेला, फिक्का व अस्वस्थ पाहायला मिळतो. म्हणून या दिवशी प्रार्थना- ‘‘प्रभो! जीवनाचा पतंग झोके खात आहे. पण दोर तुझ्या हातात आहे. तू योग्य झेल दिलास तर तो आकाशात वरवर जाईल.’’
  (संदर्भ – संस्कृती पूजन – पू. पांडुरंगशास्त्रींची प्रवचने)

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने...

नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची...

गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू...

श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

ALSO IN THIS SECTION

त्रिफळा ः महा, अमृततुल्य औषध

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो,...

॥ बायोस्कोप ॥ ऑन् लाइन्… ऑफ् लाइन् …

प्रा. रमेश सप्रे शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन?...

बहुपयोगी बिमला

अवनी करंगळकर ‘बिमला’ ही वनस्पती बहुवर्गीय वनस्पती, सर्वांच्या परिचयाची असून परसबागेत मोठ्या डौलाने वाढते. परंतु तिला मानाची पसंती दिली...

प्रतीक दर्शन

योगसाधना - ४९४अंतरंग योग - ७९ डॉ. सीताकांत घाणेकर प्रतीक ही मौनाची भाषा आहे. शांतीचे...

आरोग्याचा मंत्र ः उपवास

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) उपवास सोडताना किंवा सोडल्यानंतर एकदम विपरीत अन्न व जडान्न कधीही खाऊ नये. नाहीतर...