Home बातम्या तीन वर्षांसाठी शॅक परवाना देण्याची तरतूद

तीन वर्षांसाठी शॅक परवाना देण्याची तरतूद

0

शॅक परवाने देण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याची खात्याने तयारी ठेवली आहे. दरवर्षी ऐनवेळी शॅकवाल्यांना बोलावून परवाने वितरीत करतेवेळी गोंधळ निर्माण होतो.

पर्यटन हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. त्यामुळे त्याचवेळी शॅकवाल्यांना व्यवसाय करता आला पाहिजे. त्यासाठी शॅक वितरीत करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. तीन वर्षांसाठी परवाना देण्याचा निर्णय असला तरी दरवर्षी शॅक मालकांना आपल्या परवान्याचे नूतनीकरण करणे सक्तीचे असेल, असे परुळेकर यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी अखिल गोवा शॅक मालक संघटनेने शॅक परवाने एक वर्षाऐवजी किमान पाच वर्षांसाठी देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊनच वरील निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.