तीन पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती

0
25

राज्याच्या पोलीस खात्यातील तीन पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कामृिक खात्याने यासंबंधीचा आदेश काल जारी केला. पोलीस उपअधीक्षकपदी बढती देण्यात आलेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर, ब्रुटानो पॅक्सिटो आणि सुदेश वेळीप यांचा समावेश आहे. त्यांना गोवा पोलीस सेवेतील गट ‘अ’ राजपत्रित कनिष्ठ दर्जाचे अधिकारी या पदावर बढती देण्यात आली आहे.