तीन पिस्तुले बाळगणार्‍या युवकास कळंगुटमध्ये अटक

0
123
पिस्तुल व गोळ्या बाळगल्याप्रकरणी व फसवणूक केल्याप्रकरणी कळंगुट पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक संशयिता समवेत. (छाया : प्रणव फोटो)

फसवणूकप्रकरणी दोघांना अटक
कळंगुट पोलिसांनी काल कुलदीप सिंग या उत्तर प्रदेश येथील व आसगाव येथे वास्तव्य करून राहत असलेल्या २५ वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडील ३ पिस्तुले आणि गोळ्या जप्त केल्या आहेत.याबाबत कळंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार यांनी सांगितले की, मंगळवारी अज्ञात इसमाने आम्हाला एक युवक पिस्तुल घेऊन फिरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी सापळा रचून कुलदीप सिंग याला अटक केली व पोलीस स्थानकात आणले. त्यावेळी त्याच्याजवळ एक पिस्तुल व काही गोळ्या सापडल्या. त्यानंतर त्याने आपण आणखी दोन पिस्तुले आणि गोळ्या लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक राजेश कुमार, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर, महेश गडेकर, माधव नाईक, समीर हळदणकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी लपवून ठेवलेली दोन पिस्तुले आणि गोळ्या जप्त केल्या. दरम्यान, सोमवारी सुनिल गिरी (उत्तराखंड) व साईल भगत (बांद्रा मुंबई) या दोन युवकांनी १५ हजार रुपये घेऊन पॅराशूटमध्ये बसविण्यास येईल असे सांगून अभिषेक शुक्ला (दिल्ली) यांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी वरील दोन्ही युवकांना अटक केली.