तीन निलंबित ओडीपींबाब दोन महिन्यात अहवाल येणार

0
9

नगर नियोजन खात्याने निलंबित केलेल्या कळंगुट-कांदोळी, हडफडे-नागवा-पर्रा आणि वास्को या तीन बाह्य विकास आराखड्यां (ओडीपी) चे पुनरावलोकन व परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा मुख्य नगरनियोजक (नियोजन) राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या तिन्ही ओडीपींबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना संबंधितांना केली असून, समितीकडून दोन महिन्याच्या कालावधीत तिन्ही ओडीपींबाबत अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती नाईक यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

या तिन्ही ओडीपींबाबत संबंधित पीडीएना सविस्तर तपशील सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तिन्ही ओडीपी मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात आले की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे. या समितीची पुढील बैठक शुक्रवारी घेण्यात जाणार आहे.