तीन देशांच्या कराराबाबततुर्कीचा 24 तासांत यू टर्न

0
12

सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या तीन मुस्लिम देशांमध्ये मक्का येथे ‘मक्का संयुक्त संरक्षण करार’ झाला होता. मात्र हा करार झाल्यावर अवघ्या 24 तासांत तुर्कीने यू टर्न घेतला असल्याचे समोर आले आहे. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या संदर्भात बोलताना, हा करार कोणत्याही एका देशाविरुद्ध (विशेषतः इराणविरुद्ध) नाही, तसेच एकावर झालेला हल्ला म्हणजे तिन्ही देशांवर झालेला हल्ला असे मानले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे सौदी अरेबियाला मोठा झटका बसला आहे.
सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मक्का येथे या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हे तीन्ही सुन्नी बहुसंख्य देश आहेत. या कराराचे कायमस्वरूपी सचिवालयाचे मुख्यालय सौदी अरेबिया येथे असणार आहे. तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री नियमित बैठका घेतील. असेही या कराराच्यावेळी ठरवण्यात आले होते.