तीन दहशतवाद्यांच जम्मू-काश्मीरात खात्मा

0
6

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरुच असून, काल सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ही चकमक शोपियानमधील बडीमार्ग-अलौरा भागातील बागांमध्ये झाली. नदीम अहमद असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगामचा रहिवासी आहे.

नदीम अहमद हा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असून अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन दहशतवाद्यांना कुपवाडा जिल्ह्यातील चकमकीत सुरक्षा दलांनी यमसदनी धाडले.