तिस्ता सेटलवाडा यांच्या अटकेस स्थगिती

0
98

समाजकार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती यांच्या अटकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काल स्थगिती दिल्याने त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. २००२ मधील दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या एका वस्तुसंग्रहालयाच्या निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी उभयतांना गुजरात उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एच. एल. दत्त यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने आपल्या आदेशात सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत अटक करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी उभयतांना त्वरित अटक करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद केला होता. गुजरातच्या गुन्हे अन्वेषण विभागाने उभयतांविरुध्द फसवणूक, विश्‍वास घात असे आरोप ठेवले आहेत.