या धरणग्रस्तांना एक रक्कमी मदत देण्यास गोवा व महाराष्ट्र राज्यांच्या सरकारांकडून वेळकाढूपणा होत असल्याच्या निषेधार्थ वरील संघर्ष समितीने कालपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला होता.
काल मुख्य धरणावर या आंदोलनास प्रारंभ झाला. मात्र संध्याकाळी तहशीलदार सावंत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व येत्या ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र व गोवा या राज्यांच्या कंट्रोल बोर्डाची बैठक घेण्यात येऊन त्यात या प्रश्नी तोडगा निघेल असे सूचित करणारे पत्र समितीला दिले. त्यानुसार आंदोलन मागे घेतल्याचे समितीने जाहीर केले. आंदोलनस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.