राज्यातील सिंचन विकास क्षेत्रात आणखी 292 हेक्टर जमिनीचा समावेश याबरोबरच, सुमारे 32 हेक्टर जमीन त्यातून वगळण्याचा निर्णय सिंचन विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्राधिकरणाच्या बैठकीनंतर बोलताना काल दिली. महाराष्ट्र राज्यातील 22 किलोमीटर लांबीच्या तिळारी कालव्याचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. या कालव्याच्या दुरुस्ती कामाचा 75 टक्के खर्च गोवा सरकार उचलणार आहे आणि महाराष्ट्र सरकार 25 टक्के वाटा देणार आहे. कारण धरणाच्या 75 टक्के पाण्याचा वापर गोव्याकडून केला जातो, असे सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

