26.3 C
Panjim
Saturday, September 26, 2020

तानाजी-पीटर उपांत्यपूर्व फेरीत

गोव्याच्या तानाजी सावंत व पीटर तेलीस यांनी योनेक्स सनराईज खिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत ६० वर्षांखालील पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गोवा बॅडमिंटन संघटनेने अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेतील सामने पेडे येथील बहुउद्देशीय सभागृहात खेळविण्यात येत आहेत. पीटर व तानाजी यांनी काल गुजरातच्या अरुण कौल व आनंद थिरानी यांचा २१-१२, २१-११ असा पराभव केला. गोव्याची ही जोडी पदक मिळविण्यापासून केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. तानाजी यांनी ६५ वर्षांवरील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना महाराष्ट्राच्या तृतीय मानांकित प्रधान चंद ठाकूर यांचा २१-१७, १७-२१, २१-१९ असा पराभव करत दिल्लीच्या कुट्टीपरंबिल विजय कुमार यांच्याशी गाठ पक्की केली.

५५ वर्षांवरील गटात गोव्याच्या मनीष पटेल व सुरेंद्र कामत यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. ‘अंतिम ३२’ फेरीत त्यांनी मध्य प्रदेशच्या प्रमोद कुमार गुप्ता व रवींद्र हामे यांना २१-१३, २१-१४ असे पराभूत केले. याच गटात गोव्याच्या अशोक मेनन व रुपचंद्र हुम्रसकर यांनी माधव नारेगळकर व राजेश रामरखियानी या महाराष्ट्रच्या जोडीला २१-१२, २१-१६ असे पराजित करत आगेकूच केली. मलेशियन आंतरराष्ट्रीय मास्टर्स फेस्टिव्हल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेल्या जेफ्री डिसोझा व प्रदीप धोंड यांचा ६५ वर्षांवरील दुहेरीच्या उपांत्य फेरीत बलबीर सिंग जामवाल व अनिल मेहरोत्रा या तिसर्‍या मानांकित जोडीशी सामना होणार आहे. मिगेल रेगो व रिचर्ड डिसोझा यांच्यासमोर शशिधरा ए. व एस.के. बी. नायडू ही अव्वल मानांकित जोडी असेल. ६५ वर्षांवरील एकेरीत गोव्याच्या मिगेल रेगो यांना महाराष्ट्राच्या शौकत नूर मोहम्मद यांनी २१-७, २१-४ असे पराभूत केले.

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

दीपिका व सारा मुंबईला रवाना

>> एनसीबीद्वारे मुंबईत आज व उद्या होणार चौकशी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान व दीपिका...

आत्मनिर्भर?

येत्या गांधी जयंतीपासून गोव्यामध्ये ‘आत्मनिर्भर गोवा’ मोहीम राबवण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भरते’च्या हाकेनुसार राज्य सरकार फार मोठे...

नवे ६७३ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू

>> एकूण रुग्णसंख्या ३० हजारांपार राज्याने कोरोना पॉझिटिव्ह एकूण रूग्णाचा ३० हजाराचा टप्पा काल पार केला आहे. राज्यात नवे...

कृषी विधेयकांविरोधात कॉंग्रेसचा सोमवारी राजभवनावर मोर्चा

>> राज्यपालांकडे निवेदन देणार गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या तीन कृषी दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला...

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

कोरोनाची बाधा झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कोरोना...

ALSO IN THIS SECTION

दीपिका व सारा मुंबईला रवाना

>> एनसीबीद्वारे मुंबईत आज व उद्या होणार चौकशी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान व दीपिका...

नवे ६७३ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू

>> एकूण रुग्णसंख्या ३० हजारांपार राज्याने कोरोना पॉझिटिव्ह एकूण रूग्णाचा ३० हजाराचा टप्पा काल पार केला आहे. राज्यात नवे...

कृषी विधेयकांविरोधात कॉंग्रेसचा सोमवारी राजभवनावर मोर्चा

>> राज्यपालांकडे निवेदन देणार गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या तीन कृषी दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला...

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

कोरोनाची बाधा झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कोरोना...

मनिष सिसोदियांना कोरोना

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना आणि डेंग्यूचीही लागण झाली आहे. तसेच त्यांच्या प्लेटलेट्सची संख्याही कमी होत आहे. त्यांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण...