29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

ताण, तणाव आणि आपण

  • गिरिजा मुरगोडी

तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट अवघड, असाध्य वा तणावपूर्ण वाटत नाही. प्रत्येक समस्येतून तुम्ही मार्ग काढू शकता. खरंच, काम आवडत असेल तर शीण येत नाही.

दैनंदिन ताण-तणावांचं नियोजन कसं करावं याविषयीच्या एका व्याख्यानाला गेले होते. अभ्यासपूर्ण विश्‍लेषण आणि मुद्देसूद मांडणीमुळे ते प्रेझेंटेशन उत्तमच झाले. नंतरचा प्रश्‍नोत्तराचा भागही यामागचा विचार अधिक उलगडणारा झाला.

त्यावेळी एका नुकत्याच एम.बी.ए. होऊन काम सुरू केलेल्या युवकानं विचारलं की, कामाच्या वेळा इतक्या दीर्घ आणि अनिश्‍चित असतात की तणावाला सामोरे जाण्याचे तुम्ही सुचवलेले उपाय करायचे कसे? म्हणजे कसं असतं की तुम्ही लॅपटॉप उघडता, लॉगइन करता आणि ते कितीही तास, रात्री कितीही उशिरापर्यंतही चालतं. अशावेळी सगळा मेळ घालायचा कसा?
त्यावर मार्गदर्शक म्हणाले, ‘अगदी बरोबर! हे कामाचं जे वातावरण आहे ते आपण बदलू शकत नाही, म्हणून तर या उपायांनी स्वतःला सदैव सज्ज ठेवायचं. हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग बनलं पाहिजे. तात्पुरता उपाय नव्हे.’

खरं तर त्यांनी ज्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या करणं तसं अवघड नाहीत, पण कामाच्या रेट्यापुढे आपण प्रयत्न करत नाही. ज्या क्षणी तणाव, दडपण अति असल्याचं जाणवू लागतं तेव्हा क्षणभर थांबून तुमच्या त्या वेळच्या भावना नेमक्या काय आहेत याकडे लक्ष वेधा. आजूबाजूची माणसं, वातावरण यांचा तुमच्या भावनांवर सकारात्मक परिणाम होत आहे की नकारात्मक? याचा विचार करा. परिस्थितीची साधकबाधकता समजून घ्या, सहकार्‍यांचं मत जाणून घ्या. सर्वांच्या सहकार्याने कोणत्याही निर्णयाप्रत येण्याचा प्रयत्न करा.
आणि महत्त्वाचं, जर नियोजनानुसार एखादी गोष्ट घडली नाही तर ‘ऋरळश्र’ म्हणजे ‘ऋळीीीं ईंींशािीं खप ङशरीपळपस’ हे लक्षात ठेवा. ही सगळी शिकत जाण्याची प्रक्रिया असते हे विसरू नका. या आणि अशा अनेक गोष्टी… ज्या अनुसरणं खरंच कठीण नाही.

नीट विचार केला तर हे सर्व घरापासून नोकरी-व्यवसायापर्यंत, कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वत्र लागू पडणारं आहे. स्वतःचा आणि भोवतालच्या माणसांचा ताण यामुळे निश्‍चितच कमी होऊ शकेल.
प्रश्‍नोत्तरानंतर आयोजकांनी सुचवलं की, इथे जमलेल्या ज्येष्ठांनी आपापल्या अनुभवातून गवसलेलं काही थोडक्यात सांगावं. त्यावेळी इथले यशस्वी उद्योजक श्री. कारे म्हणाले की, मला दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट अवघड, असाध्य वा तणावपूर्ण वाटत नाही. प्रत्येक समस्येतून तुम्ही मार्ग काढू शकता.

मला हे खूपच पटलं आणि भावलंही. खरंच, काम आवडत असेल तर शीण येत नाही. आणि लोकसंग्रहामुळे नेहमीच भावनिक आधार मिळत राहतो.
कामावर प्रेम असेल तर उत्साह आणि आनंद टिकून राहतो, याची अनेक उदाहरणं आठवू लागली. आसपास, समाजात, वाचनात आलेल्या व्यक्तींच्या जीवनात अशी अनेक… पण कुटुंबातलं जवळचं उदाहरण म्हणजे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली माझी सून. तिला तिचं काम इतकं प्रचंड आवडतं की कामाच्या अतिरिक्त आणि अनियमित वेळा तासन् तास संगणकासमोर; एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं असं चालणारं काम, ताळमेळ, त्यातली आव्हानं… या सर्वांचं तिला कधी वैषम्य वा ओझं वाटत नाही. काहीतरी शिकत राहिल्याचा, साध्य करता आल्याचा आनंद असतो तो वेगळाच. क्षमता उत्कृष्ट, कळकळ मनापासूनची… तासन् तास सलग आणि थकवणारं इतकं काम करून आल्यानंतरही घरी पोचताच ती खळाळत्या उत्साहानं त्याबद्दल बोलत असते. आल्यानंतर भराभर घरातली जी कामं असतात ती उरकते आणि पुन्हा लॅपटॉप उघडून घरातलं ऑफिस सुरू करते. कारण कंपनीचे क्लायंटस् परदेशातले. तिथे तर दिवस सुरू झालेला असतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तिचे काम सुरू असते. सध्या तर काय, कोरोना महामारीमुळे ऑफिस घरीच आहे.

अर्थात ताण, तणाव, डेडलाईनची दडपणं, कधी सहकार्‍यांशी, कधी वरिष्ठांशी तर कधी क्लायंट्‌सशी होणार्‍या चर्चा, कधी वाद या सर्वांचा सामना तर करावा लागतच असतो. पण या सर्वाला सामोरं जाणंही चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतं ते त्या कामाची आत्यंतिक आवड आणि मिळणारा आनंद यामुळेच.

मलाही आयुष्यात आवडत्या कामातून मिळणारा आनंद खूप अनुभवायला मिळाला. अनौपचारिक शिक्षणपद्धती असलेल्या शाळेत शिक्षिका होते. तिथलं वातावरण इतकं प्रेरक आणि छान होतं की शिक्षणविषयक अनेक प्रयोग मला करता आले. स्वतःमधल्या अनेक सुप्त क्षमतांचा शोधही लागला, वावही मिळाला. अनेक प्रयोगांना यश, प्रशंसा आणि त्यामुळे समाधानही लाभलं. म्हणूनच काम उदंड असलं तरी कधी ओझं वाटलं नाही. अत्यंत चैतन्यमय आणि समृद्ध असा तो काळ जगता आला.

आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगू शकत नसू तर पैसा, यश, नाव, कशालाच अर्थ नाही. जे करत असू त्यात मजा वाटत असेल तर क्षणन् क्षण जगत असतो आपण.

त्यांनी सांगितलेला लोकसंग्रहाचा मुद्दा पण तितकाच महत्त्वाचा आणि अनेकदा अनुभवलेला. आयुष्यात आकस्मिक उद्भवलेले अनेक प्रसंग निभावता आले ते जोडलेल्या माणसा-नात्यांमुळेच. अशा वेळी रक्ताची नाती दूर असतात आणि ही जवळची माणसे धावून येतात. सर्वतोपरी आधार देऊन त्या प्रसंगातून अलगद बाहेर पडायला मदत करतात. प्रेषितांसारखी. याचं मोल शब्दातीत असतं.

एकंदरित सर्व प्रकारचे तणाव हलके करण्यासाठी मार्गदर्शकांनी सुचवलेल्या अनेक उपायांबरोबरच हे दोन मार्ग सर्वोत्तम. आवडत्या क्षेत्राची निवड आणि माणसांची, लोकसंग्रहाची आवड!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

शिक्षण ः कोविड आणि उपाय

विलास रामनाथ सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. विद्यालय, कुजिरा) इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना एकावेळी एक वर्ग...

भटीण आई

गजानन यशवंत देसाई मला एक प्रश्‍न पडतो, सोवळ्या-ओवळ्यात गुरफटून गेलेल्या त्या काळात भटीण आई कसं काय सगळं सांभाळून...

परीक्षा? नव्हे, सत्त्वपरीक्षा!

अंजली आमोणकर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट संपेल, परंतु परीक्षा काही संपणार नाहीत- असा माझा पूर्ण समज आहे. समज कशाला…...

सेकण्ड हॅण्ड वाहन घेताना

शशांक मो. गुळगुळे सध्या अर्थव्यवस्थेत कर्जाची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे बँका तसेच नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्या यांच्याकडून...

ड्रग्जच्या नशेचे विस्तारणारे वेड

राजेंद्र पां. केरकर अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाच्या क्रूझवरच्या रेव्ह पार्टीवर घातलेल्या छाप्यात प्रतिष्ठित मंडळी जेरबंद झाल्याने या प्रकरणाची वाच्यता...