तांत्रिक  शिक्षण संस्था ३१ मेपर्यंत बंद

0
129

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत येणार्‍या सर्व संस्था ३१ मे २०२० पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश तंात्रिक शिक्षण संचालकांनी २० एप्रिलला जारी केला आहे.

तथापि, संस्था प्रमुख किमान कर्मचारी घेऊन आवश्यक कामे करू शकतात. कामाच्या ठिकाणी केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. इतर कर्मचारी घरातून काम करू शकतात. त्या कर्मचार्‍यांनी गरजेच्या वेळी फोन किंवा इलोक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध व्हावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.