… तर मंगळवारी मासळी बाजार बंद

0
74

डिझेलचे वाढीव दर पूर्वपदावर न आणल्यास येत्या मंगळवारी राज्यातील सर्व मासळी मार्केट बंद ठेवण्याचा इशारा राज्यातील मच्छिमारी ट्रॉलर्स मालक संघटनेने दिला आहे. सध्या राज्यातील १२०० ट्रॉलर्स विविध ठिकाणी नांगरून ठेवण्यात आले असून मासळीचे दर भडकले आहेत.

दरम्यान ट्रॉलर्स मालक संघटनेचे शिष्टमंडळ येत्या २९ जानेवारी रोजी याप्रकरणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या दरवाढीमुळे ट्रॉलर्सद्वारे मासेमारी परवडत नसल्याची माहिती ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जॉन मेंडिस यांनी दिली.