Home बातम्या …तर चीनची बाजारपेठ गोव्याच्या हातून निसटणार

…तर चीनची बाजारपेठ गोव्याच्या हातून निसटणार

0

गोव्यात कमी दर्जाचेच खनिज मोठ्या प्रमाणात सापडते व चीन देशात या खनिजाला प्रचंड मागणी आहे. या मालाची ९० टक्के निर्यात चीन देशात केली जाते. सध्याच्या परिस्थितीत अनेक देश स्पर्धेत उतरल्याने गोव्यातील खाण मालकासमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

खाण बंदीचा आदेश जारी होण्यापूर्वी वर्षाकाठी १०० दशलक्ष टन खनिजाची निर्यात केली जात होती. हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. पूर्व आशियाई देशांनी नवीन पुरवठादारांकडे लक्ष केंद्रित केल्याचे एका खाण मालकाने सांगितले. ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, युक्रेन, इराण आदी देश चीनी बाजारपेठवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील खाण समर्थकांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन गोव्यातील खाण व्यवसाय लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत, असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरच सर्व काही अवलंबून आहे.

गोव्यातील खाणी पूर्वीप्रमाणे चालणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने अनेक बार्ज मालकांनी बाहेरील राज्यांमध्ये बार्जेस विकण्याची तयारी चालविली आहे.

गोव्याचे ९० टक्के खनिज चीनमध्ये निर्यात

अनेक देशांच्या स्पर्धेमुळे गोव्यासमोर समस्या

ब्राझील, द. आफ्रिका, इंडोनेशियाचे चीनवर लक्ष