Home बातम्या … तर केंद्रात मंत्रिपद मिळाले असते

… तर केंद्रात मंत्रिपद मिळाले असते

0

खासदार शांतारामनाईकांचे मत

माझ्या किंवा लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दिन यापैकी एकाच्या गळ्यात हल्लीच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेच्यावेळी मंत्रिपदाची माळ पडली असती, परंतु त्यासाठी हवे असलेले लॉबिंग स्थानिक नेत्यांनी न केल्याने संधी हुकल्याचे राज्यसभा खासदार शांतारामनाईक यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना साकडे घातले असते तर केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्याला निश्‍चितच प्रतिनिधीत्व मिळाले असते, असे नाईक यांनी स्पष्ट केले. १९८४ साली आपण व सुलोचना काटकर यांनी नवी दिल्लीला जाऊन एदुआर्द फालेरो यांच्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते, असे नाईक म्हणाले. दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला किंवा फ्रान्सिस सार्दिन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. पण त्याचा फायदा झाला नव्हता, अशी माहितीही त्यांनी दिली.

 कॉंग्रेस अधिवेशनास ३ आमदारच उपस्थित

काल मिरामार येथील गास्पार डायस क्लबमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनास विरोधी नेते प्रतापसिंह राणे, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व केपेंचे बाबू कवळेकर वगळता अन्य एकही आमदार फिरकला नाही.