…तर आयपीएल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शक्य

0
128

>> गायकवाड यांनी दिले संकेत

कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडा जगत स्तब्ध आहे. हळुहळू काही स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये सुरू व्हायला लागल्या आहेत. जर्मनीतील बुंडेस्लिगा फुटबॉल लीग सुरू झालेली आहे. परंतु क्रिकेटबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही आहे. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषकही अनिश्‍चितच्या गर्तेत आहे. त्यामुळे जर हा विश्वचषक झाला नाही तर या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा होऊ शकते असे संकेत बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलचे सदस्य असलेले माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी दिले आहेत.
देशातील कोरोनाची परिस्थितीच आयपीएलचे भवितव्य ठरणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

यंदाची नियोजित टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. परंतु तेथे असलेले सहा महिन्यांसाठीचे लॉकडाऊन आणि प्रवास बंदी यांच्यामुळे या स्पर्धेबाबत अजूनही अनिश्‍चिततचे वातावरण आहे. त्यामुळे नियोजित टी-२० विश्वचषक स्पर्धा जर झाली नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते, असे गायकवाड यांनी सांगितले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळविण्याची संधी असली तरी भारतातील कोरोना महामारी कितपत नियंत्रणात येतेय तेही महत्त्वाचे असेल. त्यावेळी येथील स्थिती नेमकी कशी आहे हे पहाणे गरजेचे आहे, असे अंशुमन यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होईल, हे कोणी सांगू शकत नाही. कदाचित या गोष्टीला दोन किंवा चार महिनेही लागू शकतात. भारतातील परिस्थितीवर ते अवलंबून असेल. पण जर स्पर्धा खेळवायची झाली तर