Home बातम्या ‘तरुण तेजपाल, तक्रारदार महिलेची जबानी तूर्त नाही’

‘तरुण तेजपाल, तक्रारदार महिलेची जबानी तूर्त नाही’

0
दरम्यान, दिल्लीचे पथक गोव्याच्या परतीच्या वाटेवर असून गरज भासल्यास त्यांना देशाच्या अन्य भागात चौकशीसाठी पाठविले जाईल, असे पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रकरणी चौकशी योग्य दिशेने चालू आहे. त्यातून बरीच तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. चौकशीनंतर सगळे समोर येईलच मात्र तोपर्यंत चौकशीतील तपशील उघड करता येणार नाही, असे मिश्रा यांनी सांगितले. 
पोलिसांनी तरूण तेजपाल व तक्रारकर्त्या महिलेशी संपर्क केलेला नाही मात्र गरज पडेल तेव्हा त्यांची जबानी घेतली जाईल, असेही मिश्रा म्हणाले.
दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असून प्रसार माध्यमांनी काळजीपूर्वक वृत्तांकन करावे व सोशल मिडीयावरून कोणीही कुणाची प्रतिमा मलीन होईल अशाप्रकारे शेरेबाजी करू नये असे आवाहन मिश्रा यांनी केले.
दरम्यान, या प्रकरणी तेजपाल  या प्रकरणातील चौकशी गोवा पोलिसांकडून अन्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्याची मागणी कोर्टात जाऊन करण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी दिल्लीतील दौर्‍यात शोमा चौधरी यांची नऊ तास जबानी घेतली. शिवाय लॅपटॉप, टॅब व मोबाईल फोन तपासून पाहिल्याचेही कळते.
गोव्यात ‘तेहलका’तर्फे आयोजित केलेल्या थिंक फेस्टवेळी आपल्यावर  लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.