तब्बल १०० कोरोना बळींची नव्याने नोंद

0
16

>> बळींची संख्या पोहोचली ३९४९ वर; नव्या ८० रुग्णांची भर

राज्यात आणखी १०० कोरोना बळींची नोंदणी नव्याने करण्यात आली आहे. जुलै २०२० ते जून २०२२ या काळात कोरोनाने मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची नोंदणी उशिराने करण्यात आली आहे. या कोरोना बळींची यापूर्वी नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९४९ एवढी झाली आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ६६९ एवढी झाली असून, कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ९.१२ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ८७७ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ८० नमुने बाधित आढळून आले. चोवीस तासांत एका रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मागील चोवीस तासांत आणखी ७३ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्के एवढे आहे.