अमलीपदार्थाची विक्री करणाऱ्यांना (ड्रग्स पॅडलर) खासगी वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्या वाहन मालकांवर कडक कारवाई करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा इशारा उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिला आहे.
अमलीपदार्थाची विक्री करणाऱ्या एका विदेशी नागरिकाला दुचाकी वाहन भाडेपट्टीवर दिलेल्या वाहन मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्ती खासगी वाहने भाडेपट्टीवर घेऊन चालवत असल्याचे आढळून आले आहे. खासगी वाहने भाडेपट्टीवर घेण्यासाठी जास्त मोबदला वाहन मालकाला दिला जातो. पेडणे पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणात अटक केलेल्या नायजेरीयन नागरिकाने हणजू़ण येथील दत्तराज पेडणेकर यांच्याकडून खासगी दुचाकी भाडेपट्टीवर घेतले होते. संशयित नायजेरीयन नागरिकाविरोधात अमलीपदार्थ प्रकरणात 9 गुन्हे दाखल झाले आहेत, असेही पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले.

